जळगाव : दिनांक:०१/०२/२०२२ वार मंगळवार रोजी जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात लोकशाही मराठी पत्रकार संघाची जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष दिपक सावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ. एन सुरडकर हे प्रमुख मार्गदर्शक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष तथा साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रविण तायडे हे होते तर बैठकीला जळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक सावळे,साप्ताहिक “आपले ज्ञानपंख” वृत्तपत्राचे सोयगांव तालुका प्रतिनिधी स्वप्निल बिरारे, धरणगाव तालुका अध्यक्ष महेंद्र चौधरी एरंडोल तालुका संघटक दीपक सोनवणे पाचोरा तालुका अध्यक्ष शेख जावेद धरणगाव तालुका उपाध्यक्ष रोहित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक दशरथ. एन.सुरडकर व प्रविण तायडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ एन.सुरडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,लोकशाही मराठी पत्रकार संघ ही संघटना अन्यायग्रस्त शोषित पीडित पत्रकारांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देणारी राज्यातील एकमेव संघटना असून या संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, लोकशाही मराठी पत्रकार संघाची राज्याची बुलंद तोफ ख-या अर्थाने मार्गदर्शक राज्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील हे असून त्यांच्या संकल्पनेतून या संघटनेचा उगम झाला. पुढे ते असे म्हणिले की, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले राज्याचे धुरंदर व कणखर असे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघाची दीपावलीच्या मुहूर्तावर स्थापना केली अवघ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये लोकशाही मराठी पत्रकार संघाची व्याप्ती राज्यभर वाढवून मोठ्या प्रमाणात पत्रकार जोडले गेले मुळातच ही संघटना निर्माण करण्याचे कारण असे की,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जातो.या लोकशाहीच्या स्तंभाला वेळोवेळी त्याच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे न्याय मागावा लागतो पण तो न्याय त्यांना मिळत नाही त्यासाठीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व हक्क मिळवून देण्यासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. या तीन महिन्याच्या कालखंडात या लोकशाही मराठी पत्रकार संघाने अनेक सामाजिक व पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावले त्यामध्ये राज्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले यांच्या अथक परिश्रमाने राज्यभर लोकशाही मराठी पत्रकार संघाचा डंका वाजला अशाप्रकारे ही संघटना असून पत्रकारांनी जास्तीत जास्त या संघटनेचे सदस्यत्व स्विकारून सोबत काम करावे असे आवाहन करुन लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ एन. सुरडकर यांनी जळगाव येथे पद्मालय शासकीय विश्राम गृहात लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या जिल्हा बैठकीत मार्गदर्शन केले.
तसेच औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष प्रविण तायडे यांनीही आपले विचार मांडले आणि धरणगाव तालुका अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनीही आपले विचार मांडले या महत्वपूर्ण बैठकीचे सुत्रसंचालन दिपक सावळे यांनी केले तर आभार रोहित पाटील यांनी मानले.
प्रतिनिधी जब्बार तडवी जळगाव