ब्रेन ट्युमरचे निदान : एक लाख रुपयाची गरज
सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल नागपूर येथे महिनाभरापासुन भरती

वाशिम – ‘माझ्या आईला ‘ब्रेन ट्युमर’ हा दुर्धर आजार झालाय. ती सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल नागपूर येथे भरती असून आतापर्यत तिच्या उपचारावर आतापर्यत एक लाख रुपये खर्च आलाय. माझी अत्यंत गरीबीची परिस्थिती असून आईला या आजारातुन वाचविण्यासाठी मला आर्थिक मदत करा’ अशी आर्त हाक ज्ञानेश्वरने जिल्हयातील दानशुरांना केली आहे. ज्ञानेश्वर महादेव वाकोडे (वय २५) हा मंगरुळपीर नजीकच्या माळशेलु येथील मोलमजुरी करणार्या परिवारातील असून त्याची आई कांताबाई वाकोडे (वय ५५) ही एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये भरती असून ब्रेनट्युमर या घातक आजाराशी झगडत आहे.

ज्ञानेश्वरचे वडील शेतमजूर असून त्याला एक भाऊ अणि एक बहीण आहे. बहीणीचे लग्न झाले असून हे दोन्ही भावंडं हॉटेलमध्ये मजुरी करुन जीवन जगत आहेत. महिनाभराआधी आईची तब्येत खालावल्यानंतर मुलांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे दाखविल्यानंतर डॉक्टरांनी आईचे सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यावरुन ज्ञानेश्वरने आईला नागपूर येथे येवून सिटीस्कॅन केल्यानंतर ब्रेन ट्युमरचे निदान झाले. आईला झालेल्या या दुर्धर आजार कळताच मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. आधीच घरात अठराविश्वे दारिद्रय त्यातच हॉस्पीटलच्या महागड्या खर्चाची चिंता या भावंडांना लागुन राहीली आहे. गावाकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून व व्याजाने जवळपास १ लाख रुपये जमा करुन ज्ञानेश्वरने हा खर्च भागवला. त्यातच ज्ञानेश्वरचे कुटुंब आयुष्मान योजनेत बसत नसल्यामुळे महात्मा फुले आरोग्य योजनेतुन त्याला आईच्या ऑपरेशनसाठी मदत मिळाली आहे. परंतु या व्यतीरिक्त गेल्या महिनाभरापासून नागपूर येथील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलमध्ये अंथरुणाला खिळून पडलेल्या कांताबाईला रक्त, औषधी, रुमचे भाडे व इतर चाचण्यासोबत बाहेरील खर्चापोटी जवळपास १ लाख रुपये खर्च आला आहे व अजूनही जवळपास १ लाख रुपये उपचारासाठी हवे आहेत. या आर्थिक मदतीसाठी व आपल्या आईचा जीव वाचविण्यासाठी ज्ञानेश्वरने जिल्ह्यातील दानशुरांकडे मदतीची याचना केली आहे. समाजातील संवेदनशिल व्यक्त आपल्याला मदत करतील अशी आशा ज्ञानेश्वरला लागून राहीली आहे.
मदतीसाठी खाते विवरण
ज्ञानेश्वर महादेव वाकोडे
रा. माळशेलु पो. टिटवा ता. मंगरुळपीर जि.वाशिम
पंजाब नॅशनल बँक शाखा शेलुबाजार
खाते क्र. ३५०२०००१००३४०७२५
आयएफसी कोड – पीयुएनबी ०३५०२००
भारतीय स्टेट बँक, शाखा शेलुबाजार
खाते क्र. ३३७२३०९०६६९
आयएफसी कोड – एसबीआयएन ००१२०१४
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206