वाशिम:- वाशिम जिल्ह्यातील राजकिय मुत्सदी म्हणून नावलौकीक असलेले मनमिळावु स्वभावाचे तसेच आपल्या संघटन कौशल्याने काॅग्रेस पक्षाला बळकटीकरण करुन पक्षाचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे झुंजार व्यक्तीमत्व दिलीपभाऊ मोहनावाले यांची मा.आ.नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष,महाराष्टप्रदेश काॅग्रेस कमिटी यांच्या आदेशाने कारंजा नगरपालिका निवडणुक व कारंजा शहर अध्यक्ष निवड या बाबतीत ‘पक्ष निरिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पञ रिसोड/मालेगाव विधानसभेचे आमदार तथा वाशिम जिल्हा काॅग्रेस कमेटिचे जिल्हाध्यक्ष अमित झनक यांनी दिले आहे.पक्षसंघटन आणी पक्षवाढीसाठी सातत्याने काम करत राहिन तसेच जिल्ह्यामध्ये काॅग्रेससाठी राजकीय योगदान देवून कार्यकर्त्यांशी समन्वय साधुन नेहमी काम करत राहिन असा विश्वास या निवडीनिमित्य दिलीपभाऊ मोहनावाले यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206