वाशिम : डॉ.स्व.सुमित इंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुटूंब आणि मित्रांनी सुइं फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून कारंजातील एक ऊब जाणिवेची या चॅरिटेबल ट्रस्टला नुकतीच २५ हजाराची मदत दिली. सुइं फाउंडेशनने गरजू विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून मदत केली जाते.यावर्षी कोरोणाचा काळ पाहता त्यांनी एक ऊब जाणिवेची ला २५ हजार रुपयांची देणगी दिली.या देणगीतून एक ऊब जाणिवेची ने गरजवंतांसाठी ५० लुगडे व फेब्रुवारी महिन्याच्या वाटपाकरिता ९ किराणा कीटची खरेदी केली आहे.त्याचे वाटप गरजु लोकांपर्यंत करण्यात येणार आहे.

सुइं फाऊंडेशनचे सदस्य़ योगेश देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सदर मदत देण्यात आली हे सुइं फाऊंडेशनच्या झालेल्या कार्यक्रमात सुइं फाऊंडेशन चे सदस्य व स्व. सुमित इंगळे चे मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक धनंजय फुरसुले,सुर्यप्रकाश इंगळे,भास्करराव देशमुख, अजय मोटघरे,यशवंत गांभवा, परमेश्वर व्यवहारे तर एक ऊब जाणिवेची चे सदस्य उपस्थित होते. यावेळी सुमित इंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एखादी संस्था ही स्वतःच मोठी होऊ पाहत असते ती इतरांना मदत करताना दिसत नाही मात्र सुइं फाऊंडेशनने एक ऊब जाणिवेची ला केलेल्या मदतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.प्रभाकरराव इंगळे, डॉ.नितीन सोनोने,डॉ.विनीत साबू,डॉ.प्रेषित पिंपळे,अनुप जोहरापूरकर,सुब्रतो कान्नव,वसुसेन देशमुख,दत्ता ताथोड ,पवन वाघ उपस्थित होते.
यावेळी एक ऊब जाणिवेची ने सुइं फाऊंडेशनचे आभार मानले. “जस पेरल्यावर उगवत”असे म्हणतात ना तसे “दिल्याने वाढते” अशी ही एक म्हण आपल्याकडे आहे.धान्य पिकवण्यासाठी सुध्दा आपल्याला जमीनीला आधी धान्य द्याव लागत मग ते आपल्याला अनेक पटीने मिळत तसच देण्याच्या बाबतीत आहे.. एकदा का आपण इतरांना देण्याची सवय लावून घेतली की आपल्याला खुप सारं मिळत राहते.तरीही मिळणार्या मदतीचा ओघ कमी होत नाही.कारण देणार्याची देण्याची क्षमता तितकीच वाढत चाललेली असते. अनेक हात हे वेगवेगळ्यापरीने मदत करत असतात.आपण जी मदत करतो ती अत्यंत गरजुंपर्यंत पोहचावी यासाठी झटतात.एक ऊब जाणिवेचीने कोरोणा काळात अतिशय उत्स्फूर्तपणे अनेक गरजवंतांना मदत केली.तळगाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचे काम एक ऊब जाणिवेची करत आहे.दिलेली रक्कम योग्य माणसांपर्यत पोहचावी म्हणुनचं २५००० रुपयाची मदत एक ऊब जाणिवेचीला दिल्याचे सुइं फाऊंडेशनने सांगितले. सुइं फाऊंडेशनच्या या मदतीची कारंजात चर्चा आहे
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206