गोंदिया : जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जे गावे कोरोनामुक्त आहेत अशा ठिकाणी वर्ग ८ ते १२ वी पर्यंत नियमित शाळा चालू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अनेक गावातून विद्यार्थ्यांना जवळपासच्या दुसर्या गावात शिक्षणासाठी दररोज जावे लागते. परंतु, शासन-प्रशासन यांच्या नियमानुसार एसटी महामंडळ विभागाने ज्या रस्त्यावर उत्पन्न जादा मिळते अशाच ठिकाणी एसटी बस चालू केली असल्याने याचा फटका वर्ग १० वी व १२ वी च्या विद्यार्थानां परिक्षा केन्द्रांवर पोहचतानां पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वर्ग १० ते १२ वी चे विद्यार्थ्यांकडे परिक्षा केन्द्रांवर जान्या-येन्याची सुविधा नाही व विद्यार्थी परिक्षे पासुन वंचीत राहु नये या करीता उपविभागील पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या संकल्पनेने देवरी उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीत येत असलेल्या रोलिस्टेसनच्या मदतीने पोलिसाच्यांच वाहनानीं विद्यार्थ्यानां परिक्षा केन्द्रांवर ने-आन केले जात आहे.
गोंदीया जिल्हा नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त व आदिवासी असल्याने अनेक नक्षली चकमकी होत असतात. त्यावर बस सेवा बंद असल्याने देवरी उपविभागीय पोलिस्टेसन हद्दीत येत असलेल्या विद्यार्थ्यानां परिक्षा केन्द्रांवर ने-आन करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर व त्यांची टिम कार्य करीत आहे. विशेषता ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा सुरू असतानीं शाळेत ये- जा करणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेर्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून सतत होत आहे.

उपविभागीय पोलिस्टेसन हद्दीत येत असलेल्या केशोरी पोलिस्टेसन तर्फे वर्ग १० वी व १२ वीच्या विद्यार्थानां परिक्षा केन्द्रांवर ने आन करण्याचे कार्य पोलीस विभागातर्फे सुरू आहे. जेनेकरुन बससेवा बंद असल्याने परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा केन्द्रांवर वेळेवर जाण्यास सोईस्कर होईल. काही पालक आपल्या पाल्यांना परिक्षा केन्द्रांवर स्वत: ने-आन कतात , तर काही खासगी वाहनाने तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना परिक्षा केन्द्रांवर सोडतात. मात्र, ज्या पालक व पाल्याकंडे कोनतीही सुविधा नाही त्या करीता पोलिस विभागाची वाहने वर्दान ठरीत आहेत.

देवरी उपविभागीय पोलिस्टेसन कार्यालया अंतर्गत येत असलेल्या संपुर्ण पोलिस्टेन मधे परिक्षार्थि विद्यार्थ्यानां परिक्षा केन्द्रांवर पोलिसांच्याच वाहनाने ने-आन करण्यास सांगीतल आहे. जेनेकरुन वर्ग १० वी व १२ वी च्या विद्यार्थानां परिक्षा केन्द्रांवर वेळेपर पोहचता येईल. जेनेकरून विद्यार्थानां परिक्षेच्या वेळेवर परिक्षा केन्दांवर पोहचता येईल.
-संकेत देवळेकर (उ.पो.अधिकारी देवरी)