बुलढाणा : मलकापूर येथील पारपेठ भागातील शहबाजखान सलीमखान यांनी मध्य प्रदेशातील शरीरसौष्ठव स्पर्धेत विजय संपादन केल्याने शुक्रवारी शरीरसौष्ठव असोसिएशन भोपाळद्वारा ‘ मिस्टर एमपी ‘ किताब बहाल करण्यात आला . पहेलवान शहबाजखान सलीमखान यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वी कामगिरी केली आहे.
यंदाच्या वर्षी भोपाळ येथे ‘ मिस्टर एमपी ‘ या स्पर्धेत त्यांनी विजय संपादन केल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष रायपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष रायपुरे यांच्या हस्ते शहबाज खान यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अरूण अग्रवाल,युसुफ खान बाळु पाटील,डॉ सै.सलीम,फिरोज खान,जावेद ठेकेदार,शाकीर खान पत्रकार ,विरसिंह दादा राजपूत समाघान सुरवाडे,हनुमान जगताप, आदी उपस्थित होते,