हिंगोली : लाॅकडाऊन संचारबंदी काळात हातांवर पोट असणाऱ्या सर्व बेरोजगारांना तात्काळ भरीव अर्थसहाय्य द्या भारतीय टायगर सेना हिंगोली जिल्हा सरचिटणीस वंसतराव गायकवाड यांची मुख्यमंत्री यांना निवेदन देत मागणी.
मागील दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यात कोरोना संकटामुळे कुठे लाॅकडाऊन तर कुठे संचारबंदी लागू असल्याने तळहातावर पोट असणाऱ्यां गोरगरीब, कष्टकरी,श्रर्मीक, बेरोजगारांचा रोजगार हारविल्यामुळे अनेक कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोरगरीब कष्टकरी श्रर्मीक हा देशाचा आधारस्तंभ असुन या सर्वांचा उदरनिर्वाह रोजगावरच अवलंबून असुन गेल्या दोन वर्षां पासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कडक लाॅकडाउन संचारबंदी लागू केल्याने अनेक कुटुंब रोजगारा पासुन आज ही वंचित आहेत अशा कष्टकरी ,श्रर्मीक, बेरोजगारांना शासनाकडून तात्काळ भरीव अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय टायगर सेना हिंगोली जिल्हा सरचिटणीस तथा आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्राप्त वसंतराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदन देवुन केली आहे.