हिंगोली जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या गोरेगांवात चार चार स्वस्त धान्य दुकान असुन सेनगाव पुरवठा विभाग आणि पर्यायी व्यवस्था दुकानदार यांच्या “तेरा मेरा जमता कहा भी जाये जनता”या गोलमाल कारभारामुळे येथे गेल्या दो वर्षांपासून चार ही दुकानची पर्यायी व्यवस्था केली असल्याने चार ही स्वस्त धान्य दुकानदार बाहेर गावातील असल्याने गोरेगाव येथे शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार धान्य वाटप केले जात नाही.तर येथे धान्य दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिन ते चार दिवस वाटप केले जात असल्याने चार ही स्वस्त धान्य दुकानात कार्डधारकांची एकच मोठी गर्दी होत आहे.यामुळे एकीकडे हिंगोली जिल्ह्याची कोरोना मुक्ती कडे वाटचाल सुरू असतांना दुसरीकडे मात्र गोरेगाव येथील चार ही पर्यायी स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मनमानी कारभारामुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहे.अनेक वेळा गोरेगाव येथील लाभार्थ्यांनी येथील चार स्वस्त धान्य दुकानची पर्यायी व्यवस्था मोडीत काढुन कायमस्वरूपी चार स्वस्त धान्य दुकान द्यावे अशी मागणी केली तरी या कडे सेनगाव पुरवठा विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थ्यांना हक्काचे राशन मिळत नसल्याने उपाशी पोटी राहण्याची वेळ आली आहे या कडे जिल्हा पुरवठा विभागाने लक्ष द्यावे नसता गोरेगाव येथील कार्ड धारक लाभार्थी आंदोलन छेडणार असल्याचे बोलले जात आहे.