उस्मानाबाद : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी शपथ घेतल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात परत कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे व भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानिमित्त लोहारा शहरात भाजपा तालुका यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवुन घोषणाबाजी करीत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला व तसेच फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकर जावळे पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तर्गे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, एससी मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे,जिल्हा कार्यकारणी सदस्य कमलाकर सिरसाट, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, प्रमोद पोतदार, प्रशांत लांडगे, मंगेश महाजन, सुधाकर पोतदार, भोजप्पा कारभारी, नागनाथ लोहार, सुधाकर पोतदार, अप्पाराव पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, भोसगा तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत मनाळे, सुनील लोळगे, नितीन दंडगुले, ओबीसी जिल्हा सदस्य सुरेंद्र काळाप्पा, युवराज चौगुले, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *