नगर सेवक अमोल मुक्कावार यांचा इशारा
गडचिरोली: आलापली अहेरी माहागाव या मार्गाची दूरावस्था झाली आहे.त्यामुळे वाहनाधारकांना खूप ञास सहन करावं लागत आहे.याररत्यांची तात्काळ दुरूस्ती करावी अन्यथा या विरुध्द राष्टवादी पक्षाकडून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कूलूप ठोकण्यात येईल असा इशारा राकाॅचे युवा नेते तथा नगर सेवक अमोल मुक्कावार यांनी दिला आहे.अमोल मुक्कावार प्रसिध्दीस दिलेल्या पञानुसार या भागातील अनेक नादुरूस्त रस्त्यांच्या दुरूस्ती करावी म्हणूनआम्ही मागील काही दिवसापासुन मागणी करित आहोत.आमच्या दबावातुन काही रस्त्यांची दुरूस्ती झाली खरी आलापल्ली अहेरी महागाव रस्त्याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी नेहमी वेगवेगळी कारणे सांगून रस्त्यांचा दुरूस्तीकडे दुर्लक्ष करित आहेत आता हे सहन करण्यापलीकडे गेले असल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने आम्ही आंदोलनाचा पविञा घेतला आहे.असे ते म्हणाले.