प्रतिनिधी नळदुर्ग
नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय क्रमांक 65 महामार्गावरील अपघाताच्या मालिका चालुच असुन अनेक निष्पापांचे जीव घेणारा रस्ता हा प्रवाशांसाठी शाप ठरत आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या कंपनीने गेल्या तीन वर्षांपासुन रस्ता उकरून ठेवल्याने व खोदकाम केल्याने हा महामार्ग मृत्यु महामार्ग बनला असुन अनेक जणांचे बळी या रस्त्याने घेतले. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे रस्त्याच्या मावेजा मिळावा यासाठी शेतकऱ्याने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती माननीय उच्च न्यायालय यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहे .परंतु याकडे जिल्हाधिकारी मात्र दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक याच रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे त्याचबरोबर अक्कलकोट येथील असलेले स्वामी समर्थ मंदिराला जाण्यासाठी हाच राष्ट्रीय महामार्गावर न जावं लागत आहे. अनेक भक्तांचे देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर नळदुर्ग परिसरातील शेतकरी आपला शेतातील पिकवलेले धान्य बाजाराला घेऊन जाता येत नाही .अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.नळदुर्ग वागदरी गुजनुर शहापूर येथील ग्रामस्थ आणखी कीती बळी घेणार असा सवाल केला जात आहेसध्या पावसाळा सुरू असल्याने जागोजागी रस्ता ,खोदकाम,मोठ्या वाहनांची वर्दळ , चढ – उतार वळणे असल्यामुळे वाहन वर्गास जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे सततच्या अपघात मुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनत चालला आहे. अपघातांची मालिका सुरूच असून, काही दिवसापूर्वी या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची बस खड्ड्यात अडकल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. रस्त्यावर पडलेले तात्काळ खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे
नळदृग ते अक्कलकोट या रस्त्याचे प्रकरण माननीय उच्च न्यायालय निकालानंतर देखील जिल्हाधिकारी यांनी अहवाल देणे बाकी असल्याने हे काम रखडलं आहे त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन हा रस्ता रस्त्यात असलेले खड्डे सुरळीत करून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे