“ध्येयवेड्या दिव्यांग राज” ला बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त स्मार्ट फोन भेट..!
उस्मानाबाद : अनाथांचे नाथ, दिव्यांग,कष्टकरी आणि कामगारांचे आधारस्तंभ लोकनेता मा.राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी अनाथ मतिमंद वसतिगृहातील विद्यार्थी राज याला प्रहार च्या माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यातर्फे पुढील शिक्षणासाठी उपयोगी साहित्य देऊन “राज” च्या जिद्द आणि चिकाटी व परिश्रमाबद्धल यतोच्छित सत्कार करण्यात आला.

आई-वडील किंवा दुरदुरपर्यंत रक्ताचा नातं नसलेल्या राज ला उमरगा शहरातुन बरेच पालक लाभले. राज हा अपंग असला तरी तो एक उत्तम चित्रकार आहे त्यामुळे तो तुळजाभवानी अनाथ मतिमंद शाळेत असताना स्वतः शाळेवर रंगरंगोटी करीत विविध आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. तिच्यातील ही कालागुणे व जिद्द पाहून शहरातील जेष्ठ विधिज्ञ ऍड प्रवीण तोतला,व्यापारी हरिप्रसाद चांडक आणि सामाजिक कार्यकर्ते मनीष सोनी यांनी राजच्या पुढील शिक्षणासाठी व करिअर घडविण्यासाठी जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये दाखल केले आहे. आज राज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून प्रशासनात अधिकारी होण्यासाठी अभ्यासात चिकाटीने प्रयत्न करतोय.
उमरगा तालुक्यातील तुळजाभवानी अनाथ मतिमंद वसतिगृह येथे तब्बल १५ वर्षे राहून उत्तम खेळाडू, चित्रकार बनलेल्या राज ने १० वी बोर्डच्या परीक्षेत अनपेक्षित गुण घेत घवघवीत यश मिळवले होते. त्यानंतर उमरगा तालुक्यातील चंद्रशेखर बदोले उच्च महाविद्यालय कसगी येथे १२ वी उत्तीर्ण झाल्यावर आता तो बी ए पदवी शिक्षण घेतोय.दरम्यान त्याच्यातील ध्येय गाठण्याचे जिद्द आणि सुप्त कलागुण पाहता शहरातील जेष्ठ विधिज्ञ ऍड प्रवीण तोतला व सामाजिक कार्यकर्ते मनीष सोनी यांनी जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशन येथे पुढील शिक्षणासाठी व आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी सोय केली आहे.
आपल्या बी ए च्या परीक्षा देण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून तो उमरगा शासकीय विश्राम गृहात राहत होता. त्याला भेटण्यासाठी तालुक्यातील बरेच प्रतिष्ठित, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी येत होते. व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत होते.
दरम्यान पाच ते सहा दिवस येथील शासकीय विश्राम गृहातील कर्मचारी दत्ता सोनकावडे यांनी दररोज नाश्ता, जेवण चहा पाणी अगदी मोफत उपलब्ध करून देत गरिबांची काय श्रीमंती असते याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर मांडले आहे.
दि.पाच(५) जून रोजी मा. राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त या राज ला प्रहार संघटनेच्या वतीने प्रहार सैनिक नागराज मसरे यांनी स्वखर्चातून स्मार्ट फोन भेट स्वरूपात दिले. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. यावेळी राचया स्वामी,पत्रकार सचिन बिद्री,वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती दिव्यांग विभागाचे इसाक शेख, प्रहार सैनिक सुरज आबाचने,पवन जेवळे,नागराज मसरे, विराट गिरी, दत्ता सोनकवडे, महादेव माने,रामेश्वर मदने, विशाल सुरवसे नारायण भुसणे आदी उपस्थित होते