उमरगा येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूलच्या प्रांगणात मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या पुढाकारातून व क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव,सेविका सुनीता राठोड, वनमाला वाले यांच्या मदतीने पाऊण एकर जमिनीवर ‘मियावाकी’ जंगल साकारले आहे. यात वीस प्रकारची वेगवेगळी झाडे ठरावीक अंतरावर लावन्यात आली आहेत.मंगळवारी या मियावाकीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु भाग्यश्री भोसले व दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या सिमरन शेखच्या हस्ते केक कापून या वृक्षांचा(मियावाकी जंगलाचा) वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, माजी विद्यार्थी गटविकास अधिकारी सुमित जाधव, व्यापारी महासंघाचे सचिव हरिप्रसाद चांडक, प्रा. किरण सगर, डॉ.यतीराज बिराजदार, सदानंद शिवदे-पाटील, प्रभावती जाधव, शीतल जावळे, केंद्रप्रमुख शीला मुदगडे,शिक्षणतज्ज्ञ के. डी. खंडागळे, डॉ.प्रमोद बर्मा, बालाजी मस्के, आदी उपस्थित होते. जपानी पद्धतीने लावलेल्या मियावाकीचा यशस्वी प्रयोग उमरगा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे झालेला आसून.दि ३ जुलै २०२० रोजी येथे ३० गुंठे जागेवर ४ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.ही झाडे उत्तम पद्धतीने जोपासली गेलेली आहेत.
मियावाकी जंगल शहरात ठरतोय ‘ऑक्सिजन हब’
“मियावाकी”जंगल हा प्रयोग जिल्ह्यात एक पायलट प्रोजेक्ट ठरला असून. अनेक विभागांचे अधिकारी व पर्यावरणप्रेमी नागरिक मियावाकी जंगल पाहण्यासाठी येत आहेत. झाडांची उंची १५ फुटांपेक्षा जास्त झालेली आसून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मियावाकीमुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळत असल्याने हे एक मोठे “ऑक्सिजन हब” म्हणून जिल्ह्यात उदयास येत आहे.याबाबत प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.