उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील डाळींब ग्रामपंचायतीमध्ये एक हाती सत्ता असलेल्या सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांच्या पुढाकाराने गेल्या १६ महिन्यापूर्वी निवडून आलेल्या नवीन ग्रामपंचायत सदस्या पैकी इरफान शेख यांना उप सरपंच करण्यात आलेले होते, निवडी वेळेस ठरल्या प्रमाणे शेख यांनी १५ महिन्या च्या कालावधी नंतर राजीनामा दिला व सर्वानुमते असिफ शीलार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या कामी मंडळ अधिकारी यामुलवार यांनी पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका बजावली, आपले मनोगत व्यक्त करताना बाबा जाफरी यांनी, त्यांनी ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणाऱ्या व विना तक्रार १७ महिन्याचा कार्यकाळ पार पाडल्या बद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले, एकाच टर्म मध्ये ठरल्या प्रमाणे उपसरपंचाची दुबार निवड होणे हा डाळिंब च्या राजकीय इतिहासातील पहिलीच वेळ असून याचे श्रेय एक दिलाने कार्य करणारया आपण सर्व सदस्यांनाच जातो असे बाबा जाफरी म्हणाले.शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सचिन बिद्री