तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा…

गोंदिया: महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे. महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे. जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करून नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन एसडीओ अनमोल सागर यांनी देवरी तहसील कार्यालयात 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

जसे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसेच 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महसूल वर्ष मानले जाते. यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. राज्य शासनाने 11 जुलै 2002 रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे.सदर कार्यक्रमात, उत्कृष्ट काम करणारे अधीकारी व कर्मचारी यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये तलाठी, कोतवाल, लिपीक, शिपाई, मंडळ अधिकारी यांचा समावेश होता.

तलाठी, कार्यालयीन कर्मचारी, कोतवाल, लिपीक, शिपाई व इतर कार्यालय येथील कर्मचारी वर्ग, शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसुल दिना निमित्य शेतकरी यांना 7/12, वाटप / उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, डोमॅशियल, इन्कम सर्टिफिकेट, वाटप व विविध दाखल्यांचे वाटप करण्यात
आले. निवडणुका, जनगणना, आर्थिक आधारकार्ड, विविध सामाजिक योजना आदी महसूल खात्यामार्फतच लोकांना विकासात्मक प्रशासन महसूल विभागाची आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा लोकभिमुख काम करण्याकडे आव्हान तहसीलदार अनिल पवार याप्रसंगी अन्नपुरवठा अधिकारी सतिस अगडे, नायब तहसिलदार शिंदे ,महशुल विभागाचे संपुर्ण तलाठी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित. कर्यक्रमाचे संचालन अश्विनी वाघमारे तर आभार नाझीर पठान यानीं मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *