पुणे : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी बजावणाऱ्या व कायदा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी मदत व पुनर्वसन, महसूल वसूली, सर्वत्र निवडणुका तसेच प्रशासन इत्यादी जनसामान्यांच्या व शासनाची जनसामान्यांतील प्रतिमा आणि मान उंचावणारे व गोरगरिबांना व शेतकऱ्यांना सतत मदतीचा हात देणारे इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना “महसूल दिना” चे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांना केलेल्या कामाची पोहच पावती म्हणून गौरव पुरस्कार प्रदणीत करून उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

सोमवार दि. ०१ आँगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे बहुउद्देशिय हॉल ५ या ठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडला. जसे १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष मानले जाते यानुसार १ ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. राज्य शासनाने ११ जुलै २००२ रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले. १ ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे. महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौणखनिज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडविलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी परवानगी देणे, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधारकार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी आदी योजना महसूल खात्यामार्फत राबविल्या जातात. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आजच्या महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते गौरव पुरस्कार प्रशस्तीपत्र देऊन प्रदणीत करण्यात आले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे