तिन दिवस लोटुनही खूनी मोकाटच…
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील पंचशील चौक पलिकडे भाड्याने वरच्या मजल्यावर राहत असलेल्या शशीकला साखरे नामक महिलेवर धार दार सश्त्राने गळ्यावर वार करत तिचा जिव घेतल्याची घटना दि. १७ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेला तिन दिवस लोटुनही त्या महिलेला जिवाशी मारणारा आरोपी देवरी पोलिसांना शोध घेऊनही सापडेनात झाला. या घटनेत देवरी पोलिसानां तपासदरम्यान अनेक शंसयीतानां ताब्यात घेत विचारपुस केली. तरी या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाटच असुन फरार असल्याचे चित्र आज स्थीतीत आहे.
देवरी शहरातील वर्दळीचा ठिकाण असलेल्या पंचशील चौकातील किरायाने राहत असलेल्या शिशुकला साखरे 35 वर्षे ईचा तिन दिवसा आधी दुपारच्या सुमारास गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत अद्नात व्यक्ती कडुन हत्या करण्यात आली होती. या महिलेची हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला होता. बऱ्याच संशयित व्यक्तींना विचारपूस करण्या करीता देवरी पोलिसानीं ताब्यातही घेतला. या हत्तेमागे असलेला आरोपी लवकरच ताब्यात येनार असल्याचा ठाम विश्वासही देवरी पोलिसांनी व्यक्त केला होता पंरतू तिन दिवस लोटुनही मारेकरी अजुनही मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्मान केल्या जात आहे.
१७ ऑगस्ट ला दुपारी घडलेल्या हत्येचा उलगडा शाळेतून घरी आलेल्या मुलांनी केला. त्या संपूर्ण इमारतीमधील किरायदार व घरमालक घटनेच्या दिवसी कोणीही हजर नव्हते हेच संधी साधून अज्ञात व्यक्तीने मृतक शिशुकला साखरे या महिलेची धारदार सस्त्राने गळ्यावर धारदार सस्त्राने वार करत हत्या केली. देवरी पोलिसानीं तपासनिला सुरूवात केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु श्वान पथकानेही काही साध्य झाले नाही. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सुद्धा घटनेच्या दिवसी घटनास्थळी भेट देत कसुन तपासनीचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे आता आरोपीला पकडन्यास काय चक्र फिरवीतात व मृतक शिशुकला साखरेच्या मारेकर्याला किती लवकर ताब्यात घेतात याकडे देवरी शहर वाशियांचे चांगलेच लक्ष लागले आहे.