दंडात्मक १,२३,८८३/- रुपये दंडात्मक कारवाई
गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापुर घाटातील दि.१८ ऑगस्ट २०२२ ला दुपारी २.३०० वाजेदरम्यान अवैध रेतीची वाहतूक करित असलेला ट्रक्टर तहसीलदार अनील पवार यानीं डवकी-शिलापुर घाटाजवळ पकडले. सदरचे वाहन चालक,मालख मौजा डवकी येथिल रहिवाशी असून यांचे ट्रक्टर क्र. एमएच -.३५ AG ५०२८या क्रमांकाचे ट्रक्टर विनापरवाना अवैध १ ब्रास रेती या गौण खनिजांची वाहतूक करित असतांना आढळून आल्याने गस्तीवर असतांनी तहसीलदार पवार यांनी पकडून जप्तीची कारवाई करून तहसिल कार्यालय देवरी येथे जमा केले .
सदर अवैध रेती वाहतूक करणारे वाहन मौजा डवकी येथील असून वाहन जप्त करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून १२३८८३/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. आजही सर्रासपणे देवरी तालुक्यात शहरात अवैध रेतीची वाहतूक खुलेआम सुरू आहे. तहसीलदार यांनी शिलापुुर घाटावर १८ ऑगस्टल ला अवैध रेतीचा ट्रक्टर पकडून जप्त करून दंडात्मक कारवाई करून दंड ठोठावला आहे. तरीपण रेती तस्कर खुलेआम देवरी तालुक्यात असलेल्या छोट्या – मोठ्या नदी, नाल्यातुन व घाटातुन अवैध रेतीची उत्खनन करुन वाहतूक करित आहेत. या रेती तस्करांना अधिका-यांची भिती नसून सर्रास पणे अवैध रेतीची वाहतूक करित आहेत. तहसील दारांच्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन व रेती वाहतुक करनार्यांचे चांगलेच धाबे दनानले आहे.