पुणे : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथे शेतीकामासाठी आलेला शेतमजूर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली.
हरिश्चंद्र बारकू वाघमारे वय – ६२ सध्या रा.वडनेर खुर्द ता.शिरूर मूळ रा. रोहा रायगड असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतमजूराचे नाव असून एकनाथ दामू निचित यांच्या शेतात सोमवार दि.५ सप्टेंबर २०२२ मंगळवार दि.६ सप्टेंबर २०२२ दरम्यान मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर ,पिंपरखेड येथील वनपाल गणेश पवार यांनी सांगितले.


ग्रामपंचायत सदस्याने फोन करून ही घटना सांगितल्यानंतर वनपाल गणेश पवार वनरक्षक कविता चव्हाण ,ऋषिकेश लाड यांनी घटनास्थळी जावून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरिश्चंद्र वाघमारे यांच्या पायाला बिबट्याने पंजा मारून उजव्या पायाला जखम केल्याने जखमी झालेले हरिश्चंद्र वाघमारे यांना टाकळीहाजी ता.शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी या घटनेबाबत संपर्क केला असता बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले हरिश्चंद्र बारकू वाघमारे यांची प्रकृती सुधारत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
ता.शिरूर जि.पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *