राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारु विक्रेत्यांना अभय

उस्मानाबाद : अवैध दारू विक्री व्यवसायाला ग्रामीण भागात अवैध दारू विक्री राजरोसपणे चालू आहे. गावोगावी अनेक हॉटेलमध्ये बनावट दारू बियर अनेक प्रकारचे विदेशी दारू देखील उपलब्ध होत आहे.
प्रत्येक गावा शहरातील मुख्य रस्त्यावर, चौका-चौकांत हातभट्टी ताडी अवैध दारू धंदे तेजीत असून राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

खुलेआम मोक्याच्या ठिकाणी चालणार्‍या या अवैध दारू विक्रीमुळे तरुणाई वाईट मार्गाला जात आहे. या व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात असून या अवैध व्यवसायाला खतपाणी घालणार्‍यांची देखील चौकशीची मागणी जोर धरत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील अवैध धंदे करणार्‍यांकडून गंगाजळी जमा करणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ‘तो’ अधिकारी कोण? अशी चर्चा शहरात सुरू आहे

विविध ठिकाणी राजरोसपणे हा व्यवसाय सुरू आहे चौकात ठिक-ठिकाणी दारुड्यांचे आपाआपसात होणारे वाद व शिवीगाळ नित्याचीच बनली आहे. अवैध धंदे करणार्‍या व्यावसायीकांकडून तालुक्यातील अधिकार्‍यांना गंगाजळी देत असल्याचे बोलले जाते. जोमाने फोफावलेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई। करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारींना काही आर्थिक लाभ मिळत असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केल्या जात आहे.

(प्रतिनिधी आयुब शेख )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *