
कुंडलवाडी शहरातील शतरंजी गल्लीत खासदार निधीतून बोर मारण्यात यावे.तसेच शतरंजी गल्लीतील इमामे खासम आशुरखाना ते बिलाल मस्जिद आणि जळबा मरकंटे यांच्या घरा पासून बिलाल मस्जिद पर्यंत रस्ता बांधकाम करण्यात यावे.तसेच परिसरातील कुंडलवाडी – हुन्गुंदा,कुंडलवाडी ते नागणी,कुंडलवाडी ते डौर,आरळी पर्यंत रस्ता बांधकाम करण्यात यावे यासबधी दि.22 सप्टेंबर रोजी पत्रकार मोहम्मद अफजल यांनी
जिल्हाचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवेदन दिले.
यावेळी मा.आमदार सुभाषराव साबणे,मा.जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड,मा.नगरसेवक गंगाप्रसाद गंगोणे आदी उपस्थित होते.