पालघर : नवनिर्मीत आदिवासी बहूल पालघर जिल्हा मुख्यालयाचे दि. १ ऑगस्ट २०१४ रोजी उद्घाटन झाले. नवनिर्मीत पालघर जिल्ह्याच्या प्रशासकिय इमारतींचे लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
पालघर जिल्ह्यास दैदीप्यमान इतिहास असुन आदिवासी समाजाची मोठी लोकवस्ती असलेला पालघर जिल्हा आहे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक व समाज जीवनाचे प्रतिबिंब नवनिर्मीत पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आवश्यक आहे. आदिवासी समाजाचे दैवत असलेले क्रांतिवीर बिरसा मुंडा तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां महामानवांचे पुतळे या ठिकाणी स्थापन करण्याची जनभावना आहे. तसेच १९४२ च्या ऐतिहासीक चलेजाव आंदोलनात आपली प्राणाची आहुती देणारे हुतात्मा स्व. काशिनाथ हरी पागधरे, स्व. गोविंद गणेश ठाकुर, स्व. रामप्रसाद भिमशंकर तिवारी, स्व. सुकूर गोविंद मोरे, स्व. रामचंद्र माधव चुरी, या पाच हुतात्म्यांचे पुतळे पालघर च्या नवनिर्मीत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
पालघरविधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वरील महामानवांचे व स्वात्रंत्रासाठी बलीदान देणाऱ्या हुतात्म्यांचे पुतळे स्थापन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार,पालघरचे पालकमंत्री श्री.दादा भुसे,आणि पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.