भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी)
पालघर : गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागला आहे.तशी गणेश भक्तांची लगबग सुरु झाली आहे.गणेशमुर्तीकारांच्या हि हाताला वेग आला आहे.सार्वजनिक गणेश मंडळांची हि विविध कामांची धावपळ सुरु झाली आहे.जव्हारच्या श्री गणेशोत्सव मंडळाची कार्यकारणी गणेशभक्तांकडून नुकतीच निवडण्यात आली आहे.
लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्रित करणे आणि लोकजागृती करणे ह्या उद्देशाने घराघरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले. त्यानंतर अवघ्या चारच वर्षानी म्हणजे १८९७ साली जव्हार संस्थाना मध्ये या सार्वजनिक उत्सवाला प्रथम सुरवात झाली. उत्सवाची तिच परंपरा तोच उद्देश टिकवून ठेवत हा उत्सव आज १२४ व्या वर्षीही आपला वारसा परंपरेने दिमाखात टिकवून आहे. आजही उत्सवात अनेक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जातात. लहान मुलांपासून ते महिला व मोठ्या व्यक्तीनं पर्यंत सर्वांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन गणेशोत्सवात मंडळाकडून केले जाते.
यावर्षी कोविड-१९ चे सर्व निर्बंध पाळून उत्सव कशा पद्धतीने साजरा करता येईल आणि उत्सवाची १२४ व्या वर्षांची कार्यकारिणी निवडणे.यासाठी गुरुवार दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.यात उत्सवाची १२४ व्या वर्षाची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्ष- निलेश घनःश्याम रावळ, उपाध्यक्ष- भुषण सुनिल शिरसाठ, सचिव- प्रसाद धिरज आहिरे, सह सचिव- चैतन्य प्रेमचंद मोरे,खजिनदार- मनोज शंकर पवार, सह खजिनदार- ओमकार राजेंद्र वाघ तर सांस्कृतिक समितीवर चैतन्य जोग,संतोष म्हाञे,अभिषेक यादव,पार्थ मुरतडक,विरेंद्र खोडकर यांची निवड करण्यात आली आहे.