जव्हार प्रतिनिधी

 पालघर :जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या   पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील मांडविहरा गावाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने वाहुन गेला होता.ह्या रस्त्याला असलेल्या मोरीचा भराव अतिवृष्टीने वाहुन गेला होता.यामुळे मांडविहरा,हुंबरण  गावांचा संपर्क तुटला होता.रस्त्याअभावी मोरी तुटल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले होते.याबाबत ग्रामस्थांनी शासकिय यंञणेला कळविले होते.मात्र आठवडा उलटला तरी शासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार इथे फिरकलेच नाहीच.निवडणुकी जवळ आल्या कि,नेत्यांचे दौरे मात्र सुरु होतात. निवडणुका  झाल्या कि,जनतेच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडतो.असे चित्र ग्रामीण आदिवासी बहुल भागात सद्या पाहायला मिळत आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांना कोणी वालीच नाही.अशी म्हणण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आज येऊन ठेपलीआहे.
   पिंपळशेत खरोंडा हे जव्हार तालुक्याचे शेवटचे टोक असून तेथुन ५ कि.मीटर अंतरावर डहाणू तालुका सुरु होतो.येथील पाड्यांवर आदिवासी वारली समाजाची वस्ती आहे.अतिदुर्गम भाग असल्याने सोयी सुविधांचा अभाव ,शासकिय यंञणेच्या विकासाची दिशा संथगतीची आहे.यामुळे गाव पाड्यांवर समस्यांची वानवा जाणवते.
    मांडविहरा गावा जवळील मोरी दि.२१ जुलैला पडलेल्या संततधार पावसाने वाहुन गेली होती.त्यामुळे आठवडा उलटल्यावर शासनाच्या मदतीची प्रतिक्षा न करता मांडविहरा,हुंबरण येथील ग्रामस्थानी एकत्र  येऊन श्रमदानाने हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता दुरुस्त केला आहे. ह्या श्रमदानासाठी

संदीप रावते,देवराम वांगड,शांताराम रावते,राजेश वांगड,गणपत भेसकर,योगेश भेसकर,उमेश दळवी,सिताराम गांगडा,चंद्रकांत रावते,
बाबुलाल रावते यांनी विशेष परिश्रम घेतले.पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेल्या ह्या श्रमदानाच्या आदर्शामुळे जव्हार तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भरत गवारी

जव्हार प्रतिनिधी
मोबा.नं.8408805860/ मो.9404346064.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *