तलासरी तालुक्यातील संबा ,घिमनिया , उधवा व डहाणू तालुक्यातील आष्टा रायपूर या भागातील अंतर्गत रस्ते अतिवृष्टीमुळे खूपच खराब झाले होते वाहने व नागरिकांना ये जा करणे खुपच जिकरीचे होत होते त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी निलेश सांबरे संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व मा उपाध्यक्ष जि प पालघर यांना कळवले असता लगेच सदर खड्डेमय रस्ते कुठलीही वाट न बघता खड्डे भरण्यासाठी लागणारे साहित्य पाठवून लोकसहभागातून खड्डे भरून देण्यात आले यावेळी जिजाऊ संस्थेचे सदस्य जावेद खान,पंकज वसावे ,मनोज अंधेर ,दिपक गोरात ,मुकेश भावर ,विक्रम शेलार,संदीप थोरात,प्रकाश भोये व दयु वेडगा आदी उपस्थित होते.