भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी )
पालघर : गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हार येथे लायब्ररी सायन्स, सामाजिक विज्ञान व लाईफ सायन्स या विषयाच्या अभ्यासासाठी "ऑनलाईन रिसोर्सेस" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या परिषदेला डॉ.किरण कौर मलया विद्यापीठ, मलेशिया, डॉ.गीता गाढवी गुजरात विद्यापीठ,अहमदाबाद, डॉ.आर.ई.मारटीन प्रा. प्राणिशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ. संदेश वाघ इतिहास विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ यांनी ऑनलाईन रिसोर्सेस या विषयावर मार्गदर्शन केले. या परिषदेत संपूर्ण देशातून १०७ पेपर आले होते. सदर पेपर संशोधन जर्नल मध्ये प्रसिद्ध केले जाणार आहेत.या परिषदेचे योजनासाठी प्रा.मच्छिंद्र वाकचौरे व प्रा. शैलेश बगडाणे यांनी परिषद सचिव म्हणून काम पाहिले. तर डॉ. पवनकुमार मुडबे, प्रा. निखिल मोराणकर व प्रा. संदीप शिंदे यांनी सहसचिव म्हणून काम पाहिले. परिषद समन्वयक म्हणून उपप्राचार्य डॉ.अनिल ना. पाटील यांनी काम केले.
या परिषदेसाठी संस्था पदाधिकारी सर. डॉ. मो.स.गोसावी सेक्रेटरी व डायरेक्टर जनरल, प्राचार्य एस. बी. पंडित चेअरमन ,गोखले एज्युकेशन सोसायटी, डॉ. दीप्ती देशपांडे एच.आर. डायरेक्टर व डॉ. सुवासिनी संत उपाध्यक्ष ,गोखले एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य पी.ए.राऊत विभागीय सचिव यांचे प्रेरणा व आशीर्वाद लाभले.प्राचार्य डॉ. एम.आर.मेश्राम यांनी परिषदेचे उद्घाटन केले. तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल ना. पाटील यांनी केले. परिषदेच्या आयोजना बद्दल सर्व सहभागी प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.