पालघर : डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथील गणू बोरकर हे शेतीची लावणी करण्यासाठी आपले बैल घेऊन जात असताना मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा आल्याने महावितरणच्या विद्युत वाहिनीची तार तुटून बैलांवर कोसळल्याने दोन्ही बैल जागीच मृत्यूमुखी पडले. सुदैवाने बैलांचे मालक गणू बोरकर हे बचावले
सदर घटनेची माहिती जिजाऊ संघटना अध्यक्ष गंजाड जानी वरठा यांनी जिजाऊ संस्थेला देताच निलेश सांबरे मा उपाध्यक्ष जि प पालघर यांनी तात्काळ १०,०००/- रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन करण्यात आले व नुकसान भरपाई करिता सर्वोतोपरी मदत केली जाईल अशी गवाही दिली.