पालघर लोकसभेचे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ,यांचा वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला . तेव्हा माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब म्हणाले वृक्षवल्ली सोयरे आमचे . जर निसर्गाचा समतोल ठेवायचा असेल वृक्षलागवड केलीच पाहिजे .आणि ते वृक्ष जगले पाहिजेत.
वृक्षांमुळे आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळतो ,कोव्हिड मुळे आपल्याला ऑक्सिजनची गरज किती आहे समजलेले आहे. माझ्या वाढदिवसाला बुके किंवा भेटी देण्यापेक्षा, प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान पाच झाडे लावावी .असे माननीय खासदार श्री राजेंद्र गावित म्हणाले .या कार्यक्रमाला शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक केदार काळे, स्वरा युवा ग्रुप चे अध्यक्ष श्री तुषार संखे ,पंचायत समिती सदस्य श्वेता देसले, चिंचणी चे सामाजिक कार्यकर्ते संजय यादव, व केतन पांचाळ, अंकित पिंपळे, अजय घरत, बिपीन पाटील, प्रीतम पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते