हिंगोली : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना मध्यें वाढ झाली होती पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना तात्काळ आटक करा अशा सूचना दिल्या होत्या यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनिय माहिती आधारे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील दोन आरोपींना आटक केली.

असुन त्यामध्ये मो.एजाज मो.अकबर रा नांदेड हल्ली मुक्काम हिंगोली तर दुसरा आरोपी शे.हाकीम शे कासीम या.पलटन हिंगोली यांनी हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातील दुचाकी चोरल्याची कबुली दिली असुन पोलीसांनी विवीध कंपनिच्या चवदा दुचाकी असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये अजुन काही नविन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळें यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे,शकील शेख,राजु ठाकुर, आदींनी केली आहे.

फारुख शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *