पुणे : घरफोडी,वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांनी जेरबंद करून सराईत गुन्हेगाराकडून ६ दुचाकी वाहने ,१ घरफोडी चोरीतील असा एकूण ७ गुन्ह्यातील २ लाख ७७ हजार ७३४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
लोकेश रवि पाटील वय – २२ वर्षे रा.पाटीलवस्ती ,केसनंद गाव ता.हवेली जि.पुणे असे जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार ,लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तपास पथकातील पोलीस नाईक फरांदे, पोलीस नाईक जगताप, पोलीस नाईक साळूंके, पोलीस नाईक रोकडे, पोलीस अंमलदार लोहार यांचेसह गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक अजित फरांदे व पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे यांना सराईत गुन्हेगार लोकेश रवि पाटील वय -२२ वर्षे रा.पाटील वस्ती केसनंद गाव ता.हवेली जि.पुणे हा केसनंद गाव येथे येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी तपास पथकाच्या स्टाफच्या मदतीने केसनंद रोडवर जोगेश्वरी मिसळ समोर सार्वजनिक रोडवर नाकाबंदी लावून सराईत गुन्हेगार लोकेश रवि पाटील वय -२२ वर्षे , रा.पाटीलवस्ती केसनंद गाव ता.हवेली जि.पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरी व घरफोडीचोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून ६ दुचाकी वाहने ,घरफोडी गुन्ह्यातील माल असा एकूण २ लाख ७७ हजार ७३४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सराईत आरोपी लोकेश रवि पाटील याला अटक करण्यात आलेली असून लोणीकंद पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.
तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळूंके, सागर जगताप, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, पांडुरंग माने, दिपक कोकरे,आशिष लोहार या पोलीस पथकाने ही कामगिरी केली.
विजय ढमढेरे
