पुणे : रेकॉर्डवरील आरोपीकडून २ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने केली.
शुभ्रत बाळासाहेब बनसोडे वय – २२ वर्षे रा.आदर्श कॉलनी ,अण्णासाहेब मगर कॉलेज जवळ हडपसर,पुणे असे ताब्यात घेवून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलीसांनी याबाबत दिलेल्या माहितीनूसार, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव , पोलीस नाईक जाधव, पोलीस नाईक साळूंके, पोलीस नाईक साळवे, पोलीस शिपाई ढोणे, पोलीस शिपाई लोहार नवरात्रौत्सवानिमित्त लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक स्वप्निल जाधव,पोलीस अंमलदार कैलास साळुंके यांना केसनंद थेऊर रोडवरील कोलवडी,माळवाडी येथील ज्योतिबा मंदीराजवळ पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला एक मुलगा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने कोलवडी,माळवाडी येथील ज्योतीबा मंदीराजवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कारवाई करून आरोपी शुभ्रत बाळासाहेब बनसोडे वय – २२ वर्ष रा.आदर्श कॉलनी अण्णासाहेब मगर कॉलेज जवळ हडपसर,पुणे यास ताब्यात घेवून त्याच्याकडून २ देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले असून आरोपीला अटक करण्यात आली.
याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पवार करीत आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त ,पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर नामदेव चव्हाण, परिमंडळ -४ पुणे शहर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, येरवडा विभाग पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे पोलीस निरीक्षक मारूती पाटील , यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार या पोलीस पथकाने ही कामगिरी केली.
विजय ढमढेरे
कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे