पुणे : अखिल उरळगाव नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित केलेला उरळगाव फेस्टिवल विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटन गावातील विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कृतीतून अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा व विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे नवरात्र उत्सव मंडळाचे संयोजक रमेश बांडे व दीपक काळे यांनी सांगितले.
उरळगाव फेस्टिवलमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.वढू बुद्रूक येथील माहेर संस्थेच्या अनाथ मुलामुलींनी नृत्य नाटिका सादर केली. गावातील लहान मुलामुलींनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. नृत्य ,नाटिका, कविता वाचन, गीत गायन पोवाडे गायन अशा प्रकारच्या कला सादर केल्या.जादुगार ईश्वर यांचे विनोदी प्रयोगाचे नेत्रदीपक जादुचे प्रयोग झाले. नवरात्रकाळात सजावट व विद्यूतरोषणाई केली होती. शारदीय नवरात्रौत्सवाची परपंरा मंडळाने सकाळ,सायंकाळची आरती, देवीची गाणी, आराध्यांचा जागर, होमहवन अशा विविध कार्यक्रमांनी जपल्याचे रमेश बांडे, दीपक काळे यांनी सांगितले.आप्पा जाधव, संतोष घायतडक, संतोष धुमाळ, सागर गिरमकर, भाऊसाहेब कोकडे, राजू पाचूंदकर, रविंद्र जाधव, संदीप बांडे, भीमराव कुदळे, पांडूरंग बांडे, अर्जून सात्रस ,सुधीर पवार, गोरख गुंजाळ, अंकुश नवले, विनोद काटे, संभाजी गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्विततेसाठी परिश्रम घेतले.
