पुणे : लासुर्णे येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळविली. सुप्रिया हणमंत दिघे या विद्यार्थिनीने १४ वर्षाखालील गटात तसेच कल्पक शरद जांभळकर या विद्यार्थ्याने १४ वर्षाखालील गटात सुवर्णपदक मिळविले.उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शंकर कवळे यांनी ही माहिती दिली.
इयत्ता दुसरी ते चौथी लहान गट, चौथी ते सातवी मध्यम गट, सातवी ते बारावी मोठा गट या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ५०,१००,२०० ,३००,४०० मीटर्स मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्याचे मुख्याध्यापक शंकर कवळे यांनी सांगितले. फलटण,इंदापूर,बारामती,माळशिरस तसेच शिरूर तालुक्यातील ३५८ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
