शिंदेवाडी येथे दिवाळी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
सोलापूर : शिंदेवाडी येथील राहुल सार्वजनिक वाचनालयात दिवाळी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.जि.प. सदस्य आप्पासाहेब उबाळे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ लतिका शिंदे या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच संजय सावंत उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष कांतीलाल साळुंके यांनी केले.चार वेद.सहा शास्त्र.डा.बाबासाहेब आंबेडकर यांची जनता पत्र.शाहु महाराज गौरव ग्रंथ.मराठी विश्वकोश. अठराव्या शतकातील पारशी भाषेतील रामायण.स्पर्धा परिक्षा पुस्तके.आगकाडी पेक्षा जगातील सर्वात लहान कुराण ग्रंथ आयुर्वेद चिकित्सा वरील दुर्मिळ ग्रंथ या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.वाचनालयात दहा हजार पाचशे ग्रंथ आहेत.वाचनामुळे माणूस ज्ञान संपन्न होतो.वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.ही समाधानाची बाब आहे.”असे मनोगत ग्रंथमित्र कांतीलाल साळुंके यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सौदागर शिंदे.विठ्ठल शिंदे.बिभिषण शिंदे. किसन सावंत.आनंद शिंदे.देविदास सावंत.तानाजी शिंदे.शिवराज शिंदे.रोहीत साळुंके.सौदागर साळुंके.गोरख पडवळे.ज्ञानेश्वर शिंदे.दता सावंत.आदी मान्यवर उपस्थित होते
वाचनालयाचे कार्यवाह संदीप शिंदे यांनी आभार मानले…….
एन टीव्ही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर