सोलापूर : रोपळे ता. माढा जि. सोलापूर येथे सावित्रीबाई फुले दूध संकलन केंद्र मधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दीपावली निमित्त बोनस म्हणून 40 सभासदांना टप व मिठाईचे वाटप करण्यात आले..
तसेच दीपावली निमित्त शुभेच्छा देऊन सर्व शेतकरी व दूध उत्पादकांचे चेअरमन श्री हनुमंत काळे व उप चेअरमन वस्ताद श्री तानाजी मेहेर यांनीआभार मानले. आत्ताच झालेल्या अतिवृष्टीमुळे बरेच शेतकऱ्यांचा व दूध उत्पादकांचा संपर्क तुटला होता. यावेळी वस्ताद श्री तानाजी मेहेर यांनी शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, व दूध उत्पादकाचे नुकसान होणार नाही याची दक्षता स्वतः घेतली .. या कार्यक्रमावर प्रसंगी हनुमंत काळे ,तानाजी मेहेर ,दिलावर तांबोळी, वसंत भगत ,लोंढे ,आबा मेहर ,धनाजी वाघमारे,काका पाटील, दिलीप पाटील ,मोहन मेहेर, भारत मेहेर, सोमा मेहेर. अर्जुन जाधव ,राजू बागवान, हे सर्व मान्यवर उपस्थित होते दिवाळीचा सण आपण शेतकरी आनंदात साजरी करू आशीच्च एकमेकांना साथ देऊ

एन टीव्ही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *