०२ आरोपीसह ०७ मोटार सायकल जप्त


वाशिम:-पोलीस स्टेशन मेहकर जि बुलडाणा येथील गुन्हा रजि. क ३५३/२०२२ कलम ३७९ भादंवि व ३५४/२०२२कलम ३७९ भादंवि चे गुन्हयात आरोपी शोध कामी व तपास कामी पोउपनि रवि मारे व पोशि/२१७८ मोहमद परसुवाले पोस्टे मेहकर येथुन तपास पथक पोस्टे शिरपुर येथे हजर झाले वरून मा. श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम, मा. गोरख भामरे अप्पर पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम व मा. सुनिलकुमार पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, वाशिम यांचे आदेशाने व मार्गदर्शना नुसार पोस्टे शिरपुर येथुन तपास मदत करीता बिट अंमलदार नापोशि/११२३ श्रीकृष्ण नागरे व पोशि/ ९३६ विनोद घनवट असे ग्राम पांगरखेडा येथे जावुन संशयीत आरोपी नामे रंधवा पवार व सुरज रंधवा पवार रा. पांगरखेडा यांना ताब्यात घेवुन पोस्टे मेहकर येथे जावुन चौकशी केली असता सुरज रंधवा पवार याने राहुल गंगाराम पवार + ०२ आरोपीचा सहभाग असले बाबत सांगीतले.त्यावरून रात्री दरम्याण पोस्टे मेहकर येथुन पोउपनि घुले, पोउपनि रवि मोरे सोबत पोहवा / १६३९ नापोशि/११५९ पोशि/२४९६, २३८०, २१७८, २१९६ असे पुढील तपास कामी पोस्टे शिरपुर येथे हजर आले, त्यांनी पोलीस मदतीची मागणी केली वरून पोस्टे शिरपुर येथील पोउपनि साठे, सपोउपनि/ ५२४ प्रकाश सरनाईक,नापोशि / ११२३ श्रीकृष्ण नागरे, पोशि/८५२ प्रविण शेंद्रे, पोशि/ ५०३ प्रविण गोपनारायण, पोशि/ ९३६ विनोद घनवट पोशि/ १३९ विनोद जायभाये चालक पोहवा / ७७१ विलास पवार सरकारी वाहनाने ग्राम चांडस येथुन ०१ आरोपी व शिरपुर येथुन ०१ आरोपी ताब्यात घेवून त्यांना तपासासंबधाने विचारपुस केली असता नमुद आरोपीतांकडुन ०७ मोटार सायकल व आरोपी पोस्टे मेहकर जि बुलडाणा पोलीसांनी ताब्यात घेवुन पुढील तपास कामी घेवुन गेले.पोलीस स्टेशन शिरपुर हददीत चोरीच्या घटने बाबत काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन शिरपुर हे सजग व तत्पर असुन सदर घटनेची गांभी-याने दखल घेवुन गुन्हेगांराविरूध्द कठोर कारवाई केली जाईल. माहिती देणा-याचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन मा. श्री बच्चन सिंग, पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम यांनी जिल्हयातील सर्व नागरीकांना केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *