सचिन बिद्री:उमरगा
शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या प्रा.सुषमा ताई अंधारे यांची सोमवारी (दि 5)रोजी सायंकाळी पाच वाजता, उमरगा शहरातील महामार्गालागत असलेल्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहेत.या वेळी खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर,जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शिवसेनेच्या वतीने राज्यभर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून रान पेटवून प्रबोधन करणाऱ्या प्रा.अंधारे यांच्या सभेसाठी निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागले असून या प्रबोधन यात्रेत तालुका व परिसरातील जनतेनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,माजी तालुका प्रमुख सुरेश वाले, विजयकुमार नागणे, भगवान जाधव यांनी केले आहे.