पुणे :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थ हर्षल नेवसे यांची महत्वाची कागदपत्रे ठेवलेले पाकीट ४ दिवसांपूर्वी शिरूर येथील पुणे – नगर रस्त्यावरील जोशीवाडी येथे गहाळ झाले होते. हर्षल नेवसे यांच्या आईचे आधारकार्ड, मुलाचे आधारकार्ड, येस बँकेचे ए टी एम कार्ड, महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्स , पॅनकार्ड इ.कागदपत्रे असलेले हरविलेले पाकीट दत्तू गलांडे यांना सापडले. ते त्यांनी दोन दिवसांपूर्वी खंडाळे ता.शिरूर येथील ग्रामस्थ साईनाथ दरवडे यांच्याकडे दिले. साईनाथ दरवडे यांनी त्यानंतर एन टी व्ही न्यूज मराठीचे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे येथील प्रतिनिधी,पत्रकार विजय ढमढेरे यांना भ्रमणध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. पत्रकार विजय ढमढेरे यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी विजय ढमढेरे यांनी तळेगाव ढमढेरे येथील ३-४ जणांना हर्षल नेवसे यांची महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट खंडाळे येथील ग्रामस्थ साईनाथ दरवडे यांना शिरूर येथे सापडल्याचे कळविले. ते पाकीट दरवडे यांच्याकडून घेवून जाण्यास नेवसे यांना सांगणे असे कळविले. त्यानंतर साईनाथ दरवडे यांचे बंधू स्वप्निल दरवडे यांनी महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट प्रामाणिकपणे हर्षल नेवसे यांना सुपूर्द केले. एन टी व्ही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628