माढा=येथील शिवलाल रामचंद वाचनालय मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.भिकुलाल राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
शिक्षणामुळे माणसाचे मन व जीवन समृद्ध होत आहे.सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची सोय केली.आज विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.याचे सारे श्रेय हे सावित्रीबाई फुले यांना जाते.सावित्रीबाई फुले या सात अक्षरात शिक्षण या शब्दाची महती आहे असे मनोगत ग्रंथमित्र कांतीलाल साळुंके यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माढा नगरपंचायतचे दिपक नाईकवाडे.असिफ तांबोळी.धनाजी माने.ग्रा.प.सदस्य इक्बाल मोमीन.कल्याण माळी.अशोक कौलगे.छाया आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर