दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन
माढा – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांचे वतीने शुक्रवार दिनांक 13 आणि शनिवार दिनांक 14जनेवारी 2023 या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन शिवछत्रपती महाराज सांस्कृतिक भवन म्हणजे रंगभवन सोलापूर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री संतोष जाधव साहेब जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या वाचन संस्कृती मध्ये वाढ व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने सोलापूर ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन केले आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी व वाचनप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे
या हेतूने ग्रंथ दिंडी.परिसंवाद. व्याख्यान.कवी संमेलन आदी समाज प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे ग्रंथोत्सवात समावेश करण्यात आला आहे.नामवंत साहित्यिक.लेखक.कवींच्या ग्रंथ संपदेचे दालन उभारले आहे . वाचनप्रेमी व सार्वजनिक वाचनालय यांनी ही ग्रंथ संपदा आपल्या वाचनालयासाठी खरेदी करायची आहे.
अशा या ग्रंथोत्सव साठी अध्यक्ष/ सचिव / ग्रंथपाल अशा तिघांनी आपल्या वाचनालयाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित रहावे असे आवाहन माढा तालुका ग्रंथालय संघाचे कार्यवाह ग्रंथमित्र कांतीलाल साळुंके यांनी केले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत