बुलढाणा जिल्ह्यातील गा मलकापूर तालुक्यातील ग्राम दुधगाव येथे शेतातील झोपडीला आग लागून या आगीत ३५ वर्षीय तरुण शेतकरी व एका कुत्र्याचा घोरपळुन मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. उत्तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलिसांच्या वतीने घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकाला सुद्धा पाचरण करण्यात आले होते.
मलकापूर तालुक्यातील मौजे दुधलगाव येथील शेतकरी गणेश विजय नारखेडे वय ३५ हे काल रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. तर रात्री उशीर झाल्याने ते झोपडीत झोपले होते. दरम्यान झोपडीला आग लागून या आगीतच त्यांचा व एका कुत्र्याचा घोरपळून मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. सकाळच्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब निदर्शनास येताच सदर घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटना कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ सी मिर्झा यांनी आपल्या टीम समवेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर झोपडीला आग कशाने लागली ही बाब अद्यापही अस्पष्ट असली तरी मृतकाच्या हातात विद्युत वाहिनीची तार आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट च्या कारणास्तव आग लागली की इतर दुसऱ्या काही कारणाने आग लागली या दिशेने पोलीस यंत्रणा तपास करीत आहे. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक मिर्झा यांच्या मार्गदर्शनात मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *