* * @package Newsup */?>
अखिल भारतीय क्षत्रिय महासभा अमरावती विभागीय अध्यक्षपदी सा. दै. मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह दादा राजपूत यांची नियुक्ती | Ntv News Marathi
बुलढाणा : मलकापूर- अखिल भारतीय क्षत्रिय महासभा अमरावती विभागीय अध्यक्षपदी सायंदैनिक मलकापूर आजतकचे संपादक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले विरसिंह ईश्वरसिंह राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती या अमरावती विभागीय अध्यक्षपदावर विरसिंह ईश्वरसिंह राजपूत यांची जुलै २०२५ पर्यंत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा.राजेंद्रसिंह ईश्वरसिंह राजपूत, महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ महामंत्री इंजि.दिलीपसिंह ठाकूर यांनी नियुक्ती केली आहे. क्षत्रिय समाजाची आणि राष्ट्राची/संघटनेची सेवा करण्याबरोबरच संस्थेचा सन्मान वाढवावा अशी अपेक्षा नियुक्ती पत्राद्वारे व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातून प्रसिद्ध होणारे नावलौकिक सायंदैनिक मलकापूर आजतक वृत्तपत्राचे संपादक वीरसिंह दादा राजपूत यांची अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या अमरावती विभागीय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याने यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.