जिल्हाशल्य चिकित्सक या पदावर नियमबाह्य बसवलेल्या डॉक्टर भुसारी यांच्या विरोधात फौजदारी दाखल करण्याची मागणी एका पत्राद्वारे 17/11/2022 रोजी तक्रारदार यांनी उपसंचालक यांच्याकडे केली होती. त्या पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसंचालक आरोग्य सेवा अकोला यांनी सदर माहिती ही बुलढाणा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाची असल्याने ते पत्र बुलढाणा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयास वर्ग केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार म्हणजेच कुणाचे खेटर कुणाचा पाय असे झाले असून नियमबाह्य नियुक्त्या चा कारभारा सुरू आहे अशाप्रकारे नियमबाह्य जिल्हा शल्यचिकित्सक या पदावर डॉक्टर भुसारी यांना बसवण्यात आले आहे मात्र जिल्हा शल्यचिकित्सक या पदाकरिता पदावर बसलेल्या डॉक्टर भुसारी यांचा एक मोठा खाजगी दवाखाना आहे आणि ते स्वतः खाजगी प्रॅक्टिस सुद्धा करतात पण त्या जिल्हाशल्यचिकित्सक या पदावर बसविलेल्या अधिकाऱ्याने किंवा सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये असा शासनाचा जीआर असून तरीसुद्धा उपसंचालक यांनी सरकारी पगार घेणाऱ्या डॉक्टरांचे खाजगी रुग्णसेवेचा मुद्दा गरम असतानाच जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर डॉक्टर भुसारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र यांची नियुक्ती ही कोणत्या नियमात झाली. तर या संदर्भात तक्रारदाराने माहिती अधिकार कायदा कलम 2005 अंतर्गत माहिती मागितली आहे अन्यथा नियमबाह्य असल्यास त्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.