औरंगाबाद : सिडको महानगर येथील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी सिडको प्रशासना सोबत विषयांवर चर्चा करण्यात आली. या मध्येसिडको वाळुज २ यांचा विकास करण्यास मागील ३दशकापासून सुरूवात करूनही अद्याप मुलभूत सुविधा पासून या दोन्ही नगरातील नागरिक वंचित असुन ते नियमित पणे द्यावे तसेच उर्वरित विकास कामे करावे ही नम्र प्रमुख मागणी तिसगावचे उपसरपंच तथा सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत असलेल्या शिष्टमंडळाने केली या अपुर्ण रस्ते, सर्विस रोड, पथदिवे, क्रिडांगण, पाणी पुरवठा, ऑनलाईन पाणी बिल व ईतर दैव्यक स्वीकारणे, कचरा संकलन धुर फवारणी या विषयावर चर्चा करून हे नियमित पणे द्यावे तसेच उर्वरित पथदिवे उभारणी करणे, कचरा संकलन तसेच फवारणी साठी जास्तीत जास्त संख्येच्या तुलनेत कर्मचारी नियुक्त करून निवेदा काढणे तसेच मलनिस्सारण प्रकल्प, नविन पाण्याची टाकी उभारण्यात यावे,देवगिरी नदीवरील पुलांची उभारणी करणे, रस्ते दुरूस्ती तात्काळ करणे, क्रिडांगण ची दुरूस्ती करून भाडेतत्त्वावर देणे, गोलवाडी टेकडीचा विकास करणे, सर्विस रोड ची उभारणी करणे ही मागणी केली असता या सर्व मागणी तातडीची समजून करण्याचे आश्वासन दिले या बैठकीस सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे उपसरपंच तिसगाव उपाध्यक्ष नरेंद्रसिंगयादव, पि एस गुजर, बाबासाहेब गावंडे, अंकुश लेंडाळे, विरभद्र बनशेट्टी, अमर राजपुत आदीची उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
Ntv न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400