सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथून शनिवारी (ता. १८ ) ९५ क्विंटल कापसाने भरलेला आयशर ट्रक रविवारी (ता. १९ ) रात्री हातनुर (ता. कन्नड ) टोलनाक्यावर मिळून आला असून चोरटे मात्र पसार झाले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या २४ तासाच्या आत अजिंठा पोलिसांनी चोरीला गेलेल्या आयशर ट्रकच्या शोध लावला असून फरार झालेल्या चोरट्यांच्या अजिंठा पोलीस शोध घेत आहेत.
पानवडोद येथील राजेद्र तुकाराम दौड यांच्या मालकीचे आयशर ट्रक (एमएच २१ बीएच ३०२४ ) मध्ये शनिवारी गोळेगाव येथे औरंगाबाद जळगाव महामार्गावरील आदित्य पेट्रोल पंपावर रात्री ८ वाजेच्या सुमारास उभा करून ठेवला होता.मात्र नेहमी प्रमाणे चालक रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आयशर जिनींग मध्ये घेऊन जाण्यासाठी पेट्रोल पंपावर आला असता त्याने रात्री उभा केलेला आयशर त्याला दिसून आला नसल्याने मालक राजेद्र तुकाराम दौड यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून ७ लाख ६६२०० रुपयाचा कापूस व १५ लाखाचा आयशर ट्रक असा एकूण २२ लाख ६६२०० रुपयाचा मुद्देमाल चोरल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यान विरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच सिल्लोड उपविभागीय अधिकारी डॉ.विजय मराठे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गर्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, अली शेख,पोहेकॉ बाबा चव्हाण,रविंद्र बागुलकर आदीच्या पथकाने तपास वेगाने सुरू करून चोरीला गेलेले आयशरचा शोध लावला . कन्नड तालुक्यातील हातनुर टोल नाक्यावर उभा असल्याची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी कन्नड पोलीस व गोळेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने रात्री दीड वाजता चोरीला गेलेल्या कापसाच्या आयशर ची पळताळणी करून ट्रक ताब्यात घेतला.मात्र आयशर ट्रक चोरी करणर्याने तिथून पलायन केले होते . हा आयशर आता मुळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे . आयशर ट्रकची चोरी करणार्याचा मात्र अजूनही
पोलीस त्यांच्या शोध घेत असल्याचे अजिंठा पोलिसांनी सांगितले .
सिल्लोड प्रतिनिधि मुजीब शेख