शिवना : औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या विभागीय निवड चाचणीमध्ये सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील सलीम उर्दू हायस्कूलच्या पठाण जियान खान यहियाखान व शेख अफफान अजीम या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. हे खेळाडू वसमत जि. हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खेळणार आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक यहियाखान पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मो. शाकीर यांनी अभिनंदन केले.
सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख