मागण्या पुर्ण न झाल्याने संप दूसऱ्या दिवसीही सुरुच
खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबाद शहरातील चिश्तीया महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले असून आज संप आज दूसऱ्या दिवशी ही सुरुच होता संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यांबाबत दिनांक 2 फेब्रुवारीपासून आंदोलन चालू आहे. जूनी पेन्शन योजना,रिक्त पदे भरणे,10.20.30. वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करणे या व अन्य मागण्यां पूर्ण न झाल्याने काल दी 20 फेब्रुअरी पासून संपात सहभागी झाले असून आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी संप दुसऱ्या दिवशी ही सुरुच होता बेमुदत आंदोलन चा
या आंदोलनात महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी शेख शकील, शेख सादिक, मोहम्मद रियाजोद्दीन, शेख मसुद, शेख जहीर, शेख जाकीर व शहा हाशम हे सहभागी झालेले आहेत. या आंदोलनास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गांनी पाठींबा दिलेला आहे.
……………
खुलताबाद,औरगाबाद