अजिंठा घाटातील जंगलात फुटा दरवाजाजवळील तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात गेल्या काही महिन्यांपासून पाणी भरण्यात आले नसल्याने , वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे . याबाबीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हेतू पुरस्सर दुर्लक्ष दिसून येत आहे . अजिंठा वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी , यासाठी डोंगरात वनविभागाने ठिकठिकाणी कृत्रिम १० पाणवठे तयार केले होते . मात्र वाढत्या उन्हामुळे हे पाणवठे आजच्या घडीला कोरडठाक पडले आहेत . त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणीच मिळत नसल्याने हे प्राणी पाण्याच्या शोधात भटकताना दिसून येत आहे . या वनपरिक्षेत्रात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने वन्य प्राणी, मुके जीव पाण्यावाचून तडफडत आहेत .त्यातच पुरेसे खाद्यही मिळत नसल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा नगरी वस्तीकडे वळवला आहे .वन्य प्राण्यांचे हे स्थलांतर धोक्याचे असून प्राण्यांसाठी प्राण्यांची पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी वन्यप्रेमी कडून होत आहे .अजिंठा वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जंगलात कुपनलिंका खोदून कृत्रिम पानवठे तयार करून त्यात नियमितपणे पाणी भरले जात होते .मात्र सध्या स्थिती कडक ऊन असल्याने ,पाणवठ्यात पाणी भरण्यात आलेले नाही, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे .त्यामुळे पानवठे पाण्याअभावी कोरडे राहत असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे . वन विभागाचे या कृत्रिम पानवट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे .पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी परिसरातील गाव वस्तीकडे धाव घेत आहेत . दरम्यान पिंपळदरी वसई गावाच्या सभोवतीला अजिंठा लेणीच्या डोंगर रांगा आहेत .धंदाट जंगलाने वेढलेल्या यापरिसरातील नागरिकांना वन्य प्राण्यांचे वकचित दर्शन घडते . उन्हाळ्यात पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात नीलगाय, हरिण , ससा , कोल्हे, लांडगे, खोकड,तडस, मोर, पक्षीसह वन्य प्राण्यांची पाण्यासाठी खुप वनवन भटकत आहे . त्यानाही पाण्याच्या शोधार्थ कधी तर त्याच्या जीवावर बेतते . कारण कुत्र्याच्या हाल्यात प्राणी सापडतात नाहीतर रात्रीचे विहिरीत पडतात . यात नेहमीच वन्य प्राण्याचे जीव जातात . तर कधी पाणी शोधताना रस्ता ओलाडताना वहानाच्या धडकेने कितीतरी प्राण्यानी आपला जी गमवला आहे . मुख्यतः वानरांनी परिसरातील वस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे .गाव परिसरातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी वानराचे टोळकेही दृष्टीस पडत आहेत .मात्र हे वानर गावातील घराच्या छतावर उड्या मारून पत्रेचे नासधूस करत आहे .रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी वन्य प्राण्यांचा भटकंतीने ग्रामस्थ हैरान झाले आहेत .त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेले हाल लक्षात घेत सर्वच कृत्रिम पाणवठ्यात त्वरित पाणी सोडवून या मुक्या जीवाची तृष्या भागवावी अशी मागणी वन्यप्रेमी आणि ग्रामस्थांकडून होत आहे . छायाचित्रात अजिंठा वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी घाटात तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे कोरडे ठक पडलेले दिसत आहे .