उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे,देशाचे महान शास्त्रज्ञ,नोबल पुरस्कार विजेते डॉक्टर सी.व्ही.रमण यांच्या सन्मानार्थ दि 28फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात विविध प्रयोग सादर करत साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील वैज्ञानिक बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक समाज उपयोगी प्रोजेक्ट तयार केले होते.यामध्ये सौरऊर्जेवर
चालणारा पाळणा,पवण चक्की निर्मित वीज,तसेच भारतातील राज्य आणि त्यांच्या अचूक राजधान्या सांगणारे स्वंयचलित यंत्र, मानव शरीरातील अवयव रचना आणि त्याचे महत्त्व पटवून सांगणारे प्रोजेक्ट सोबतच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ पदार्थ निर्मिती.असे एक ना अनेक प्रोजेक्ट सादरीकरण करण्यात आले.लहान लहान विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण प्रयोग व सादरीकरण पालक वर्गातून आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले गेले
.
यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जाधव माडीवाले,शिक्षिका सौ.मुजावर,भोसले,हुगार,साळुंखे,कलमले,गायकवाड,माळकरी आणि ईतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कष्ट घेतले.
दरम्यान अगदी खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक विद्यार्थी आपला सादर केलेला प्रोजेक्ट किती चांगला आणि समाज उपयोगी कसा आहे..? हे सांगण्यात अगदी तल्लीन झालेले दिसून आले.