प्रतिनिधी उस्मानाबाद
उस्मानाबाद डेपोतील ढोकी मुरुड या एस.टी. वर कार्यरत असलेल्या महीला वाहकास भंडारवाडी येथे शासकिय कामात अडथळा आणुन शिवीगाळ करुन व एस.टी. बसवर दगडफेक करुन, शासकिय कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी आकाश नंदकुमार पाटील (शिंदे) रा. आरणी याची प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीमती अंजु शेंडे यांनी निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपी तर्फे आरोपी तर्फे अँड. अमोल हणुमंतराव गुंड यांनी युक्तीवाद केला.
सदर प्रकरणामध्ये फिर्यादीने आरोपी विरुदध् ढोकी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा कलम 353,332,504 सह 34 अन्वये गुन्हा क्र. 120 / 19 दाखल केला होता. या प्रकरणात तपासाअंती हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधिश साहेब, उस्मानाबाद यांच्या न्यायालयात सत्र खटला क्र. 26/22 प्रमाणे चालले. या सत्र खटल्यामध्ये दि. 12/10/2022 रोजी आरोपीला कलम 353 भा.द.वि च्या अपराधाकरीता एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच, कलम. 332 भा.द.वि च्या अपराधाकरीता सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता, सदर शिक्षेच्या विरोधात आरोपीने अॅड. अमोल गुंड यांच्या मार्फत अपील दाखल केले होते, जे अपील क्र. 44/22 प्रमाणे प्रमुख जिल्हा न्यायाधिश यांच्या न्यायालयात चालु होते. या अपीलामध्ये आरोपी तर्फे अॅड. अमोल गुंड आरोपीचे ओळख ही सरकार पक्षाने संशया पलीकडे जावून सिदध् केले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. आरोपीच्या व सदरचा युक्तीवाद गृहीत धरुन न्यायालयाने अपील क्र. 44/22 मधुन आरोपी आकाश नंदकुमार शिंदे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर अपील हे दोन महिन्यामध्ये निकाली काढण्यात आले. आरोपी तर्फे अॅड. अमोल हणुमंतराव गुंड यांनी काम पाहीले त्यांना अँड. किरण चादरे व अॅड. मिराजी मैदाड यांनी सहकार्य केले.